मुंबई : देशाचे माजी सरंक्षण मंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. मुलायम सिंह यादव यांची राजकीय कारकिर्द खुप मोठी आहे. त्यांची राजकीय कारकिर्द वेगवेगळ्या कारणांमुळे देखील चर्चेत राहिली आहे. आज त्यांनी 82 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. यातच आता एका भाजप नेत्याचं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.
“….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”
मुलायम सिंह यादव हे 10 वेळा आमदार तर 7 वेळा खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. यातच ज्या वेळी भाजपनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्यामध्ये रथ यात्रा काढली होती. अन् बाबरी मशिदीवर कारसेवक चालून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यांनी पोलीसांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.
“बाळासाहेबांनी हिंदू म्हणण्याची हिमंत तुम्ही गोठवली”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
त्याचाच धागा पकडत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो. असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यामुळे मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर देखील भाजपने त्यांच्यावर अशाप्रकारे विधान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अनेक दिवसापासून मुलायम सिंह यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान काळात त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी रूग्णायलयात रांग लावली होती. मुलायम सिंह यांच्या निधनामुळे अखिलेश यादव यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सध्या समाजवादी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते रूग्णालयाबाहेर जमले आहेत.
कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो. pic.twitter.com/msDQtpoLXL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2022
Read also
- “शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?
- राजकीय लढाई सुरूच..! उद्धव ठाकरेंची आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव
- “कधी गाणे, कधी नकला, कधी शिवीगाळ..! विनोदी कलाकार आहेत की मंत्री?”
- अब्दुल सत्तारांची सचिवाला शिवीगाळ..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज
- “नेताजी अतिशय दिलदार अन् मोठ्या अंत: करणाचे होते”; सुळेंनी मुलायम सिंह यांना वाहली भावपूर्ण श्रंद्धाजली