नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर गुरूग्रामच्या मेंदाता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे समाजावादी पार्टीतील कार्यकर्त्यांना मोठं दुख झालं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
अनेक दिवसापासून मुलायम सिंह यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान काळात त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी रूग्णायलयात रांग लावली होती. मुलायम सिंह यांच्या निधनामुळे अखिलेश यादव यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सध्या समाजवादी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते रूग्णालयाबाहेर जमले आहेत.
“तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
मुलायम सिंह यादव यांच्यावर 22 ऑगस्टपासून उपचार सुरू होते. 2 ऑक्टोबर दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयुमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिनज पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायम सिंह यादव यांना श्वसनाचा- रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारीया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेऊन होत्या.
Read also
- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’
- “सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घेत होते”; राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य
- अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
- शिंदे गटाकडून 1 लाख तर ठाकरेंकडून 10 लाख शपथपत्र दाखल..! धनुष्यबाणासंदर्भात आयोगाचा निकाल?
- “पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”