मुंबई : समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याने त्यांच्यावर मेंदाता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची ही झुंज अखेरची ठरली आणि वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रंद्धाजली वाहिली आहे.
अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
माजी संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकारणात अतिशय महत्वाचे स्थान असणारे समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. ते नेताजी म्हणून ओळखले जात होते. नेताजी अतिशय दिलदार आणि मोठ्या अंत: करणाचे होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्तींची पाठराखण केली. मागील तीन दशकांपासून राज्याचे व देशाचे मोठ्या कौशल्याने नेतृत्व केले. त्यांच्या निधनामुळे उत्तर भारतातील राजकारण तसेच समाजकारणातील एक महत्वाचे पर्व काळाच्या पडद्याआड गेले असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाकडून 1 लाख तर ठाकरेंकडून 10 लाख शपथपत्र दाखल..! धनुष्यबाणासंदर्भात आयोगाचा निकाल?
तसेच मुलायम सिंह यादव म्हणजे मातीशी नाळ जोडलेला नेता. उत्तर प्रदेशच्या राजकाणात त्यांचा विशेष असा दरारा असायचा. नेताजी अशी ओळख असलेले मुलायम सिंह हे खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाड्यातील कसलेले पैलवानच होते. शेतकऱ्यांसाठी आपला बुलंद ठेवणारे मुलायम सिंह यादव यांची लोकसभेतील भाषणे आजही पहिली की त्यांच्यातला संघर्षशील नेत्याने दर्शन होते. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
“पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”
मुलायम सिंह यादव म्हणजे हेलिकॉप्टरमधून ज्या गावाच्यावरून प्रवास करतील त्या गावचे नाव सांगणारा माणूस, कार्यकर्त्यांना कसे बांधून ठेवावे याचे कसब त्यांच्यापाशी होते. जुने जाणते कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा जिव्हाळा असायचा. उत्तरप्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, 10 वेळा आमदार, 7 वेळा खासदार म्हणून ते विजयी झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Read also
- “….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”
- “बाळासाहेबांनी हिंदू म्हणण्याची हिमंत तुम्ही गोठवली”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
- समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’
- “सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घेत होते”; राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य