मुंबई : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून मुंबईतील लोकल ट्रेन सेवा बंद आहे. अनेकदा राज्य सरकारकडून ही सेवा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले, मात्र लांबणीवरच पडत गेले. आता राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत घेण्यात येईल, उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो.
कोरोना व्हायरसमुळे इतर सेवा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप मुंबई लोकल ट्रेन सुरू झालेल्या नाहीत. महिला व इतर कर्मचारी वर्गांसाठी ट्रेन सुरू झाल्या होत्या, मात्र पूर्ण क्षमतेने सर्वांसाठी सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली असल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे.
आता सर्व व्यवहार पूर्ववत होत असून लोकल रेल्वेसेवा सर्वासाठी केव्हा सुरू करणार, अशी विचारणा न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला केली असता, मंगळवापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू
- ‘अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान’
- ‘बाळासाहेब म्हणायचे आम्ही औरंग्याची नाही, संभाजी महाराजांची औलाद आहोत’
- ‘त्या’ घटनेबाबत रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करणार
- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
- 2024 पर्यंत लढा देण्याची आमची तयारी, शेतकरी आंदोलकांचा इशारा