महापालिकेतील भाजपा नगराध्यक्षांव विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारावी असा आदेश काढण्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महाविकासआघाडीचे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नागपूरचा गड असलेल्या पालिकेत तुकाराम मुंढेंची बदली केली होती. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.
येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्या आधीच मुंढे आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये मोठे घमासान सुरु झाले होते. मुंढे आणि अधिकारी यांच्यातील वाद काही नवीन नाही. अखेर आज मुंढे यांची बदली झाल्याचे दिसून आले.
ALSO READ THIS
लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं । सोनिया गांधींच्या बैठकीत CM ठाकरेंची गर्जना