मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचा काम करत आहेत. नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून गावातील गावगुंडाबद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहे. एवढेच नाही तर ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
नाना पटोले हे खोटे बोलत आहेत. त्यांच्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा जाण्याची वेळ आली आहे. मी त्यांच्या विरोधात आंदोलन केले तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. तिथे चारशे लोकांची गरज होती का? आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, मी याविरोधात न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थबसणार नाही, असे ते म्हणालेत.
ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
काँग्रेसचे खासदार कोल्हे यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले ते कलाकार म्हणून काम करत आहेत. दुसरीकडं नाना पटोले म्हणतात आम्ही सिनेमा चालू देणार नाही. त्यामुळे हा राजकीय सिनेमा बंद करा, पटोले यांना महात्मा गांधी यांच्यावर प्रेम असेल तर तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले.
आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लिल नृत्याचे प्रकार उघडकीस हेत आहे. या अवैध धंद्यांना ऊत आला आहे, बेकायदेशीररित्या सुरु असलेले धंदे सट्टापट्टी पालकमंत्र्यांचा याकडे लक्ष नाही. पोलिसांनाही सगळ्या धंद्याची माहिती पोलिसांना असून हफ्ते वसुली सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच शहराबाहेर फार्म हाऊसवर असे धंदे सुरु असल्याचेही ते म्हणालेत.
Read also:
- अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… निवडणूकी आधीच…
- भाजपला सोडचिठ्ठी देऊन उत्पल पर्रिकरांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पत्र
- डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
- माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय