पुणे : शिरूर लोकसभाक्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी मागील काही काळात एका चित्रपटामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच वाद पेटल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे तर काहींनी त्यांना थेट विरोध केला आहे. याच वादावर काल पडदा टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतरही अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीतून काही नेते विरोध करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी देखील अमोल कोल्हेंची बाजू घेतली आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की जेव्हा अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी येणार होते तेव्हा मी त्यांना घेऊन पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यानंतर २०१९ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची जी काही भूमिका साकारली आहे ती त्यांनी २०१७ साली केली होती.
ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
त्यामुळे त्यांनी बरोबर केलं किंवा चुकीचं केलं हा सवालच उपस्थित होत नाही. पवार साहेब अन जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझीही भूमिका मांडली आहे. जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही, त्याने एक कलावंत म्हणून त्यांनी ऑफर स्वीकारली होती. पुरोगामी विचार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकिय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.
Read also:
- भाजपला सोडचिठ्ठी देऊन उत्पल पर्रिकरांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पत्र
- डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
- माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय
- आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप