मुंबई : मणिपुरच्या मुद्यावरून संसदेत काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी संसदेत बोलत असतांना संसद टिव्हीचा कॅमेरा देखील राहुल गांधींवर कमी वेळ दाखवण्यात आला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संसदेत अविश्वास ठरावावार बोलतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
मी गेल्या १९ वर्षापासून राजकारणात आहे. पण मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते माझ्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही. प्रत्यक्ष दौऱ्यावेळी मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष किती विकोपाला गेला आहे हे मी अनुभवलं आहे. मणिपूर हे एक राज्य राहिलेले नाही. भाजपाने त्याचे तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये एवढं सगळं घडत असतानाही पंतप्रधान हसत बोलत होते. ते मणिपूरला जाऊ शकत नाही, याची काही कारणं आहेत. पण त्यांनी किमान मणिपूरबद्दल बोलायला हवं. एवढी आमची अपेक्षा होती. असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला
दरम्यान, भाजपाने मणिपूरचे दोन तुकडे केले. तसेच भारतीय लष्कराला सांगितल्यास मणिपूरमधील सुरु असलेला हिंसाचार ते २ दिवसात थांबवू शकतात. मणिपूर २ दिवसांत शांत होईल, पण त्यांना मणिपूरमधील आग विझवायची नाही.” “मणिपूरचं विभाजन झालं आहे. नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. ते थांबवायचं नाहीय. मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभागृहात जवळपास २ तास १२ मिनिटांचं भाषण केलंय यामध्ये नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारच्या विषयावर फक्त २ मिनिटं बोलले. नरेंद्र मोदी मणिपूरबाबात बोलताना हसत होते, दोन तास चेष्टा करत होते. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर