परभणी : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता शिवेंद्रराजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना कारण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांची भेट.
अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात तीनदा भेट झाली आहे. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे सांगून या बाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला होता. मात्र या भेटीगाठीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांनी पक्ष सोडून गेलेले अनेक मोठे नेते परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या भेटीनंतर या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले होते. तसेच, मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.
Read Also :
- ‘महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन
- महाराष्ट्रातील या 6 व्यक्तींना प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर
- ‘जे महाराष्ट्रात घडले तेच पश्चिम बंगालमध्ये घडत आहे’, शिवसेनेचा केंद्रावर निशाणा
- मुंबई पालिका निवडणुकीसाठी एमआयएम देखील मैदानात, मोर्चेबांधणीसाठी ‘या’ राज्यातून आमदार येणार
- ‘100 कोटी म्हणजे काही गोळ्या-बिस्कीट नाही, जे यांना देतील’, पडळकरांचा शशिकांत शिंदेंवर निशाणा