पिंपरी-चिंचवड : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते, असा दावा देखील त्यांना केला होता. या दाव्यानंतर आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे.
100 कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत, जे यांना देतील, असा टोला गोपीचंद पडळकरांनी शशिकांत शिंदेंना लगावला आहे. काही लोकांचा काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत, त्यांना कोण कशासाठी पैसे देईल? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला.
ग्रामपंचायतमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळं काहीतरी विधान करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे, बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत पडळकरांनी शिंदेंवर निशाणा साधला.
अशा गोष्टी जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे देखील पडळकर म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहरात हेळवे समाजाच्या मेळाव्यास उपस्थित असताना ते बोलत होते.
Read Also :
- ‘मी पुन्हा येणार’ म्हणण्याची फडणवीसांची सवय ट्रम्पला लागली, अशोक चव्हाणांचा टोला
- आमच्या मुळावर येणाऱ्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, वडेट्टीवारांचा इशारा
- … म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र
- ‘नागपूरचे ‘चड्डीवाले’ भविष्य ठरवू शकत नाही’, राहुल गांधींचे आरएसएसवर टीकास्त्र
- ‘भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच धडा शिकवू’, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा इशारा