मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांना ईडीने समन्स बजावले होते. यातच ईडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. तर कार्यकर्त्यांकडून एकच दादा रोहित दादा अशा घोषणा करत इडीच्या बाहेरील परिसर घोषणांनी दणाणून सोडला आहे. यावेळी शरद पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.
हेही वाचा…“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार”?
रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ?
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने 50 कोटी रुपयांत कन्नड सहकारी साखर कारखान्याची बँक लिलावातून खरेदी केली होती. पण या लिलावात सहभागी असलेल्या कंपनी बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा…“धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो,” शरद पवार गटाने कसली कंबर
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावरून रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या लिलावात फेरफार करून कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या ५० कोटी रूपयात खरेदी केला होता. असा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवार यांच्यावर इडीने कारवाई केल्याचं सांगितलं जातंय.
रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत असतांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते मुंबईत जमा झाले आहेत. त्यामुळे इडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर कार्यकर्त्यांकडून एकच दादा रोहित दादा, आमचा दादा पळणारा नाही तर लढणारा दादा अशा आशायचे बॅनर देखील कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आता चौकशीत काय माहिती उघड होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती