मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची पायी यात्रा आता पुण्यात पोहचली आहे. येत्या २६ जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहे. परंतु त्याआधी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आलेल्या मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय तसेच पाण्याची सोय आजुबाजूला असलेल्या गावातील लोक करीत आहेत. तर यातच मनोज जरांगे पाटलांच्या झोपण्याची व्यवस्था मुसलमान लोकांनी केल्याची माहिती समोर आलीय. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…“ज्यांच्या विरोधात निवडणुक लढविली, आता त्यांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा नवा डाव”
मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज ज्या पद्धतीने मुंबईकडे मार्गक्रमण करतोय आणि वाटेत सर्व जाती-धर्माच्या लोकांचा त्याला पाठिंबा मिळतोय, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. देशात एकिकडे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना, सरकारमधील नेत्यांकडून जातींमध्ये भांडणं लावली जात असताना मराठा समाजाने आरक्षणाविषयी आपली भूमिका आणि कृतीला अजिबात भरकटू दिलेलं नाही. असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच कदापी यशस्वी होणार नाहीत. आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला हा हक्क सामंजस्याने आणि कायदेशीर मार्गाने मिळावा. अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलीय.
मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज ज्या पद्धतीने मुंबईकडे मार्गक्रमण करतोय आणि वाटेत सर्व जाती-धर्माच्या लोकांचा त्याला पाठिंबा मिळतोय, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.
देशात एकिकडे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना, सरकारमधील नेत्यांकडून जातींमध्ये भांडणं…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार”?
हेही वाचा…“धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो,” शरद पवार गटाने कसली कंबर