नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी ठाकरे गटाने नाशिकमधून रणशिंग फुंकले. नाशकात ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाला ठाकरे गटातील खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर या अधिवेशनात ठाकरे गटाने चार ठराव मंजूर केलेत.
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..
ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाला यावेळी राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशवासीयांचे पोट भरण्याचे काम मुंबई करते, मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे अधिवेशन याचा धिक्कार करत आहे. असा पहिला ठराव मांडण्यात आला. तर मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याचा निर्धार देण्याचा दुसरा ठराव मांडला. तर केंद्र सरकारने जो कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. असा तिसरा तर सरकारी सेवेसाठी नोकर भारती कायमस्वरूपी सरकारी यंत्रणेचा वापर करुन करावी. असा चौथा ठराव मांडण्यात आला.
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
दरम्यान, मुंबईत जेव्हा दंगली पेटल्या होत्या. तेव्हा माझे शिवसैनिकांनी तुरूंगवास, मार आणि बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहेत. तेव्हा आम्ही कुणामध्येही भेदभाव केला नाही. आज सगळ्या शिवसैनिकांवर खोट्या केसस दाखल केले जाताहेत. मग तुमच्याकडील जे भ्रष्ट लोक आहेत. त्यांच्या चौकशा कधी लावणार ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाणे, नाशिक, नागपूर तसेच सगळ्याच महापालिकेतील घोटाळा काढा. तसेच हे सर्व काढत असाल तर पीएम केअर घोटाळ्यातीलही घोटाळा बाहेर काढा? याच्या माध्यमातून सगळा पैसा बाहेर काढा. परंतु यांच्यावर भ्रष्टचाराची बातमी आली की फक्त एकच दिवस चालते. रूग्णालयात चालवलेल्या रूग्णवाहिकेत आठ हजार कोटीचा भ्रष्टाचार करता ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार”?
हेही वाचा…“धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो,” शरद पवार गटाने कसली कंबर
हेही वाचा…“ज्यांच्या विरोधात निवडणुक लढविली, आता त्यांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा नवा डाव”