मुंबई : शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादी आमदार अपात्र याचिकेवर सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी सुरू आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उलट साक्ष घेण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीचे पुरावे गायब झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची निवडणुक झाली होती. त्यानंतर महत्वाचे कागदपत्र कपाटात ठेवले होते. मात्र आता पक्ष फुटीनंतर पक्षाचे महत्वाचे कागदपत्र गायब झाले आहेत. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचंही नाव घेत अजित पवार गटावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत.
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रात प्रकरणाच्या सुनावणीसाठी विधीमंडळ १० दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे. महाराष्ट्रात २७ ते २९ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे सभापती, उपसभापती व सचिव या परिषदेला उपस्थित राहणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा
हेही वाचा…“30 वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेसबरोबर राहून काय काँग्रेस होणार”? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”
हेही वाचा…“घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्यापाठीमागे ढाल बनून उभा आहे”, Ed च्या चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा