जळगाव : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपाध्यक्ष तशा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना कॉंग्रेसमधून ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर कॉंग्रेसने निलंबणाची कारवाई करण्यात आलीय. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना निलंबणाचे पत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
रावेर लोकसभा मतदारसंघातून उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील इच्छूक आहेत. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उल्हास पाटील यांच्यावर निलंबणाची कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता डॉ. उल्हास पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून रावेर लोकसभा मतदारसंघातून केतकी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे खासदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलीच्या चर्चा सुरू होत्या. रक्षा खडसे यांच्या जागी उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरू होती. त्यातच आता केतकी पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
हेही वाचाअखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….