मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांच्या उपस्थित रमेश गोवले यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. रमेश गोवले यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना गटाचं संघटन अधिक मजबूत होणार असून शिंदे गट बॅक फुटवर जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत रविवारी दापोली येथे शिंदे गुरूजी स्मृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रमेश गोवले यांनी गितेंची भेट घेतली अन् ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, माजी उपसभापती अनंत बांद्रे, उसगाव विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, संदेश तोडणकर आदि उपस्थित होते.
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान
दरम्यान, रमेश गोवले यांनी हर्णे विभागाचे विभाग प्रमुख म्हणून यशस्वी कामगिरी पार पडली होती. पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर झळकलेल्या कर्दे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद त्यांनी भुषिवले आहे. अनेक वर्षे ते ग्राम पंचायत सदस्यही राहिले आहेत. उन्नती ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहेत. ते कुणबी समाजाचे नेते असून सामाजिक राजकीय सहकार आदी विविध क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्त असलेल्या रमेश गोवले यांचे दशकाहून अधिक काळ शिवसेना नेते अंनत गिते यांच्याशी कौटुंबिक स्नेहसंबंध देखील आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
हेही वाचाअखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत