नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा आसाममध्ये पोहचली आहे. यातच प्रभू श्रीराम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने राहुल गांधी यांना आसाम मधील एका मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी मंदिराच्याच बाहेर बसून राहिले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये असून आसामच्या वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पुजा-अर्चना करणार होते. आसामच्या बोरदोवा ठाणा क्षेत्रातील हे पवित्र स्थळ आहे. नागांव जिल्ह्यात हे स्थळ आहे. श्रीमंत शंकरदेव यांचं हे जन्म स्थआान आहे. कॉंग्रेस सरचिटणीस जयराम म्हणाले की हे सर्व राज्य सरकारच्या दबावाखाली सुरू आहे. कॉंग्रसेच्या दोन आमदारांनी मंदिर मॅनेटमेंटकडून वेळ मागितला होता. मंदिर व्यवस्थापकांना कोणतीही अडचण नव्हती. पण आता राज्य सरकारच्या दबावानंतर हे सर्व सुरू आहे.
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
श्री श्री शंकरदेवजींनी आसामचे विचार उत्तम प्रकारे मांडले. ते आपले गुरू आहेत, आपणही त्यांच्या मार्गावर चालतो. इथे आल्यावर इथेच दर्शन घ्यावे असा विचार मनात आला होता. आम्हाला ११ तारखेला निमंत्रण देखील मिळाले होते, पण नंतर आम्हाला सांगण्यात आले की सर्वजण जाऊ शकतात, पण राहुल गांधी जाऊ शकत नाहीत ! जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी जाईन. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
दरम्यान, मंदिरात प्रवेश न दिल्याने राहुल गांधी मंदिराच्या बाहेर रस्त्यावर बसले आहेत. रस्त्यावर बसून रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हे गाणं गात आहेत. यातच आधी आम्हाला सकाळी सात वाजता यायला सांगितलं होतं. पण आता सांगतायत की दुपारी, तीन वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश मिळणार नाही. असे जयराम रमेश म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”