नवी दिल्ली : गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली,संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पुर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
मी आज प्रभू श्रीरामाची माफी मागतो. आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षांपर्यंत हे काम करू शकलो नाही. आज ती कमतरता भरून निघाली. मला खात्री आहे की प्रभू श्रीराम आज आपल्याला नक्कीच क्षमी करतील असे नरेंद्र मोदींनी म्हटले. तसेच आपले राम आज आले आहेत. आता आपले राम झोपडीत राहणार नाहीत. भव्य मंदिरात राहणार आहेत. २२ जानेवारी हा दिवस कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहण्याजोगा झाला असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी नमुद केले.
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पन झाल्यानंतर संपुर्ण देशात एकच जल्लोष करण्यात आला. तसेच आज सांयकाळी दिपो प्रज्वलन करण्याचंही आवाहन मोदींनी केले. तर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्केअरवर राम मंदिर सोहळ्याचा उत्साह दाखवण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप