नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा आसाममध्ये पोहचली आहे. यातच प्रभू श्रीराम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने राहुल गांधी यांना आसाम मधील एका मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी मंदिराच्याच बाहेर बसून राहिले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये असून आसामच्या वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पुजा-अर्चना करणार होते. आसामच्या बोरदोवा ठाणा क्षेत्रातील हे पवित्र स्थळ आहे. नागांव जिल्ह्यात हे स्थळ आहे. श्रीमंत शंकरदेव यांचं हे जन्म स्थआान आहे. कॉंग्रेस सरचिटणीस जयराम म्हणाले की हे सर्व राज्य सरकारच्या दबावाखाली सुरू आहे. कॉंग्रसेच्या दोन आमदारांनी मंदिर मॅनेटमेंटकडून वेळ मागितला होता. मंदिर व्यवस्थापकांना कोणतीही अडचण नव्हती. पण आता राज्य सरकारच्या दबावानंतर हे सर्व सुरू आहे.
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
दरम्यान, मंदिरात प्रवेश न दिल्याने राहुल गांधी मंदिराच्या बाहेर रस्त्यावर बसले आहेत. रस्त्यावर बसून रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हे गाणं गात आहेत. यातच आधी आम्हाला सकाळी सात वाजता यायला सांगितलं होतं. पण आता सांगतायत की दुपारी, तीन वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश मिळणार नाही. असे जयराम रमेश म्हणाले.
आसाम मध्ये राहुल गांधींना मंदिरात जाऊ दिले नाही म्हणून ते मंदिरासमोर रस्त्यावर बसून
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
हे गाणं गात आहेत.#BharatJodoNyayYatra pic.twitter.com/7IkBMgvps9— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश