मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होत आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत दाखल झाले असून आज दुपारी १२ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्या नगरी फुलांनी सजली आहेत. यातच आता वकिल असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
मी एक चांगला कायदेशीर हिंदू असण्याची अनेक कारणे आता मला स्पष्टपणे दिसायला लागली आहेत. माझा ‘राम’ मनामनात असतो, गोंगाट व दिखाव्यात नसतो. भव्य बॅनर्स वरील क्रुद्ध राम चांगल्या हिंदूंचा नाही तो राजकारणासाठी रामाचा वापर करणाऱ्यांचा आहे. आनंद आहे मी विचार करतो व अविचारी झुंडीचा भाग नाही. असं असीम सरोदे म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अयोध्येतील ‘रामपथ’ तयार करण्यासाठी जी घरे तोडली, झोपड्या जमीनदोस्त केल्या व जे संसार उघड्यावर आणले तेथेच तर खरा ‘राम’ राहतो. राजकीय स्वार्थासाठी ज्या रागीट श्रीरामाचे बॅनर्स लावले गेले आहेत, ज्याला मोदी म्हणे आज घर देणार आहे तो राम जनतेचा नाही केवळ भाजपचा आहे. आर्टिकल 51 नुसार संविधान सांगते की वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे सरकारचे2 काम आहे. आज रामाच्या नावाने जे सुरू आहे ते घटनाबाह्य आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. सरकारने धर्माचे प्रदर्शन पुरस्कृत करणे हे सुद्धा संविधानाशी सुसंगत नाही. आज रामाच्या नावाने जे सुरू आहे ते घटनाबाह्य आहे. लोकशाहीसोबत आज असंग संग करीत आहे याचे भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वाईट वाटले पाहिजे. आर्टिकल 51 नुसार संविधान सांगते की वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे सरकारचे काम आहे. प्राणप्रतिष्ठा हा विषय कोणत्याच दृष्टीने विज्ञानाशी संबंधित नाही. अंधश्रद्धा पसरवणे हे सरकारचे काम नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान