रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्यातील आमखोल वांझलोळी येथील नितीन दुर्गावले व त्यांच्या पत्नी सरपंच निधी दुर्गावले यांनी ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी योगेश कदम यांच्यासह माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे, दापोलीचे तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी, निखारगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
गेल्या दीड वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रीय होते परंतु, तिथे त्यांना कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील माझ्या विकासात्मक धोरणावर प्रभावित होऊन सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
दरम्यान, सर्वांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दापोली तालुक्यात एकूण 105 ग्रामपंचायती असून एका ग्रामपंचायतीवर प्रशासकाचे वर्चस्व आहे तर जवळपास 86 ग्रामपंचायती या शिवसेनेकडे आहेत याचा मला अभिमान असल्याचे मत यावेळी मांडले. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने गावासाठी लागणाऱ्या कुठल्याच निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन यावेळी योगेश कदम यांनी उपस्थितांना दिले.
आज दापोली तालुक्यातील आमखोल वांझलोळी येथील श्री. नितीन दुर्गावले व त्यांच्या पत्नी सरपंच सौ. निधी दुर्गावले यांनी ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांसह माझ्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमखोल व वांझलोळी गाव साधारण दीड वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत… pic.twitter.com/XurHwBxMrt
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात ‘मराठा वादळ’ मुंबईत धडकण्यापुर्वीच सरकार ॲक्शन मोडमध्ये, सरकारने आखली मोठी रणनिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी