मुंबई : २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत साजरा केला जात आहे. हा सोहळा सगळ्यांना बघता यावा, यासाठी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना संपुर्ण एक दिवसाची सुट्टी जाहीर केलीय. मात्र आमचा अभ्यास बुडला, तर राम ल्ला सुध्दा खूश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनीनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील कौतूक केलं आहे.
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाचा जन्मउत्सव साजरा केला जाणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र २२ जानेवारीची सुट्टी झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी नाकारली आहे. त्यांनी यांसदर्भात फेसबूक पोस्ट लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील या विद्यार्थ्यांनीचं कौतूक केलं आहे.
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
झेलम परांजपे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलंय की, आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं…..सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर…. आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार….
दरम्यान, या सावित्रीच्या लेकींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रीरामाला कुणीच नाकारत नाही पण राम हा भक्तीचा बाजार मांडण्याचा नाही, राम आस्थेचा विषय आहे. झेलम परांजपे तुम्ही घेतलेल्या कणकख भूमिकेसाठी तुमचं खूप खूप कौतुक! असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
या सावित्रीच्या लेकींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
श्रीरामाला कुणीच नाकारत नाही
पण राम हा भक्तीचा बाजार मांडण्याचा नाही,
राम आस्थेचा विषय आहे.झेलम परांजपे तुम्ही घेतलेल्या कणकख भूमिकेसाठी तुमचं खूप खूप कौतुक!https://t.co/hhYKnNY987
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार