नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने राम मंदिराचा मुद्दा समोर आणला आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस भारत जोडो न्याय यात्रेमार्फत निवडणुकांचा प्रचार करण्यास व्यस्त आहे. परंतु यातच आता केंद्र सरकार आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. संपुर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये एक समिती स्थापन केली होती. स्थापन केलेल्या समितीने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यतेखाली अहवाल तयार केला असून तो आता कायदा आणि न्याय मंत्रालय आणि उच्च स्तरीय समितीला सादर केला जाणार आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
एक देश, एक निवडणुक अशी संकल्पना भाजपने मागच्या वर्षी पुढे आणली. त्यानुसार भाजपने माजी राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या अध्यतेखाली एक समिती देखील स्थापन केली. तर भारतीय कायदा आयोग पुढील आठवड्यात यावर हा अहवाल सादर करणार आहे. कायदा आयोगाच्या सुत्रांनी हा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. तर एक राष्ट्र, एक निवडणूक सुलभ करण्यासाठी आवश्यक घटनादुरूस्ती करणे हा सर्वात मोठा अडथळा होता. मात्र, यातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. हा अहवाल पुर्णत्वाकडे आला असल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
एक देश, एक निवडणुक साठी २०२२ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी निवडणुक आयोग एकाच वेळी निवडणुका घेण्यास पुर्णपणे तयार आणि सक्षम असल्याचे म्हटले होते. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये कायदा आयोगाने एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, नोकरशहा, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ञांसह संबंधितांचे मत मागवले होते.
उच्चस्तरीय समितीचे प्रमुख माजी राष्ट्रपती कोविंद यांनी बुधवारी दिल्लीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गोर्ला रोहिणी आणि माजी निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्याशी चर्चा केली, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोध केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल