धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच धाराशिव मध्ये ठाकरे गटाचा पक्ष मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले. ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी ओमराजे निंबाळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी रामदास कोळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन
नितीन काळे म्हणाले की, ज्यांचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकर्याने आत्महत्या केली, तेच आता शेतकर्यांचा कळवळा दाखवित आहेत. पोटाला चिमटा देवून कमवलेली मिळकत यांची कर्जे सारण्यासाठी बँकेत भरण्याची वेळ शेतकर्यांवर आली आणि आता हेच पुतणा-मावशीचे प्रेम दाखवित आहेत. औसा येथील सभेत कोणापुढे झुकलात? निवडून आल्यावर सभागृहात पहिल्या भाषणात कोणाचा उदो-उदो केलात? कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीचे संघटन पाहून खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी इतिहासात सर्वाधिक निधी महायुती सरकारने दिला आहे. या सगळ्या बाबींमुळे खासदार राजेनिंबाळकर यांचा तोल ढळू लागला आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला पुरेसा असल्याचा दावाही नितीन काळे यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश