मुंबई : राज्यात झालेली पक्ष फुट, त्यात शिवसेना पक्ष चिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. आगामी लोकसभा आणि महायुतीत राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यातच आता ठाकरेंनी भाजप अन् राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला जोरदार झटका दिला आहे. भाजप आणि संघातील अनेकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय.
हेही वाचा…“…म्हणून रोहित पवारांच्या मतदारसंघात विखेंनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला”
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्यय, विश्व हिंदू परिषदेचे घनश्याम दुबे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधून बांधून पक्षात स्वागत केले आहे. याचसोबत अनेकांचा पक्ष प्रवेश देखील पार पडला.
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल
यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख व भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रविचंद्र उपाध्यय, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय बजरंग दालचे अक्षय कदम, भाजप जिल्हा महिला उपाध्यक्ष माधवी शुक्ला, भाजप जिल्हा महासचिव राम उपाध्याय ,राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ब्राम्हण परिषद संजय शुक्ला, प्रदीप तिवारी, शिंदे गट, भाईंदर जिल्हा महासचिव, विश्व हिंदू परिषद, जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवलीचे दीपक दुबे ,विश्व हिंदू परिषद, तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवलीचे दिनेशकुमार यादव,बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख सूरज दुबे यांनी देखील ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही गर्वाने हिंदू आहोत असं सांगत असताना काही नालायक लोक मात्र हिंदू, हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानीमाता या सर्वांचा भगवा आहे. पण त्यातही काहीजण भेदभआव करत आहेत. अशी टिकाही ठाकरे यांनी केली. यातच आज तुम्ही सर्वांनी मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या. मन की बात तर विचार करून केली जाते. पण आज या सर्वांनी दिल की बात सांगितली. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ
हेही वाचा…“मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक लोकसभेचं महत्व वाढलं,” कोण रिंगणात, कोण ठरणार किंगमेकर ?
हेही वाचा…“राज्यात मोदी साहेबांचे दौरे वाढले, पक्ष-कुटुंब फोडल्यानंतर झालेल्या सर्व्हेचा भाजपने धसका घेतलाय”