सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अलिकडे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. मागच्या एक आठवड्यापुर्वी नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर आज सोलापूर जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन व गृहप्रदान व लाभ वितरण करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुजरांना पंधरा हजार घरकुलांचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील मंत्री आमदार, खासदार उपस्थितीत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
रोहित पवार म्हणाले की, आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हेही वाचा…नाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
‘विकासपुरुष’ ही मोदी साहेबांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवा वर्ग निराशेच्या गर्तेत आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यासारखे अनेक घटक आज आंदोलने करत आहेत. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नाकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही. आदरणीय मोदी साहेब आज आपण महाराष्ट्रात आहात, किमान आज तरी अस्वस्थ आणि रखरखत्या महाराष्ट्राच्या मनाची बात आपण करावी ही मराठी मनाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल अशी आशा देखील रोहित पवारांनी व्यक्त केली.
आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा… pic.twitter.com/P7KSRYgrg7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“…म्हणून रोहित पवारांच्या मतदारसंघात विखेंनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला”
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल