मुंबई : मुंबई महापालिकेत कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यातच आज सुरज चव्हाण यांना पीएमल कोर्टात हजर करण्यात आले. यावर कोर्टाने याप्रकरणी सुनावणी पार पडली असता. यावर मोठा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी काल सुरज चव्हाण यांना अटक केली होती. त्यानंतर सुरज चव्हाण यांना आज पीएमपीएल कोर्टात हजर करण्यात आले. यावर कोर्टात सुनावणी पार पडली. त्यात सुरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता २२ जानेवारीला कोर्टात काय सुनावणी होणार ? सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई होणार का ? असे अनेक सवाल यानिमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाचा आता आणखी एका घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रक्ट देण्यात आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचानाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”