मुंबई : राज्यात महायुती सरकार आल्यापासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. दररोज होणाऱ्या घटनावरून विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना दिसत आहेत. यातच आता रेल्वेत तिकीट नसल्याने रेल्वेच्या टीसीने प्रवाशाला मारहाण करतांनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा….“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी शरद पवार गटाने या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. अन त्यात असं म्हटलंय की, अरे काय बापाचं राज्य आहे का ? आपल्या अधिकारात दहशत निर्माण करणं हे सरकारचं ब्रीदच आहे. आता तेच ब्रीदवाक्य रेल्वेचे टिसी सत्यात आणताना दिसतायत. प्रवाशाकडे तिकीट नाही तर त्याला दंड करा, पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करणार ? प्रवाशाच्या कानाखाली हाणायचा अधिकारी तुम्हाला कुणी दिला ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
दरम्यान, ‘हर नारी का सम्मान होना चाहिए’ ही भाषणबाजी ऐकायला छान वाटते. पण वास्तव किती भयंकर आहे हे सरकारला कधी कळणार? अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचाराची ही एकच घटना नाही, तर अशा अनेक घटना देशभरात घडतात, दिल्लीतले ‘निर्भया’ प्रकरण लोक अजूनही विसरलेले नाहीत. महिला सक्षमीकरणासाठी इव्हेंट करताना सरकारला राज्यात ज्या अत्याचाराच्या घटना घडतायत त्याबद्दल काहीच वाटत नाही का? यापुढे नुसती स्वप्न दाखवून निवडणुका जिंकता येणार नाहीत. असा हल्लाबोलही त्यांनी केलाय.
अरे!! काय बापाचं राज्य आहे काय ?
आपल्या अधिकारात दहशत निर्माण करणं हे सरकारचं ब्रीदच आहे. आता तेच ब्रीदवाक्य रेल्वेचे टिसी सत्यात आणताना दिसतायत. प्रवाशाकडे तिकिट नाही तर त्याला दंड करा, पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करणार ? प्रवाशाच्या कानाखाली हाणायचा अधिकार… pic.twitter.com/NzrcAGuJtc
— NCP (@NCPspeaks) January 18, 2024
READ ALSO :
मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…