मुंबई : कोरोना काळात मुंबईत महानगरपालिकेत कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना ईडीने काल अटक केली आहे. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावरून ठाकरे गटातील नेत्यांनी जोरदार टिका केलीय. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणाऱ्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायमच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे.असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर आम्ही दोन दिवसांपूर्वी जे जनता न्यायालय केलं आणि त्याचा जो एक प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण यांची अटक ही राजकीय अटक आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा….“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
दरम्यान, खिचडीच्या नावाखाली हजारोंचा घोटाळा झाला आहे. या खिचडी पाकिटमारांचा कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. खिचडी कॉन्स्ट्रॅक्टचे पैसे संजय राऊत यांच्या मुलीच्या खात्यावरही गेले आहेत. गरीबांसाठी असणारी खिचडी ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी खाल्ली. संजय राऊतांची मुलगी विधिता राऊत, भाऊ संदीप राऊत आणि सुजित पाटकर यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्यातील लाखो-करोडो रूपये गेले आहेत. या सर्वांची चौकशी करण्यात यायला हवी. अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं