मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने त्यांच्या मुख्य प्रवक्तेपदी उमेद पाटील यांची नियुक्ती केली आहे. यानंतर अमोल मिटकरीर यांचं मुख्य प्रवक्तेपद काढून उमेश पाटी यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तसंच सहा महिन्यांमध्येच अमोल मिटकरींचं पद का काढून घेण्यात आलं. असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर आता खुद्द अमोल मिटकरी यांनी खुलासा केलाय. तर मनसेचे नेते गजानन काळे यांनी मिटकरींना खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
अमोल मिटकरी यांचं फक्त सात महिन्यातच पद काढून घेतल्यानंतर राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. त्यावर मला मुख्य प्रवक्ते पदावरून हटविल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्यामुळे पक्षाबद्दल चुकीचा मेसेज जात आहे. मुख्य प्रवक्ता ही निवड अद्याप केली नव्हती. मी पक्षाचा प्रवक्ता आहे. आज उमेश पाटील यांना पहिल्यांदा अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी मिळाली अभिनंदन. असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
दरम्यान, घासलेटचोर स्वत:चं स्पष्टीकरण पण स्वत: देत आहे. पक्षाने याचा खुलासा करावा, नाही तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील करावा. पक्ष याची मजा घेत आहे. आता दारोदारी घासलेट विकायला यांना पाठवू नये म्हणजे झाले. ते मासिक पगार सुरू ठेवला आहे का दादांनी की तो बंद केला आहे. असा खोचक सवालही गजानन काळे यांनी केलाय.
घासलेटचोर स्वत:चं स्पष्टीकरण पण स्वत: देतोय…
अरे पक्षाने याचा खुलासा करावा, नाहीतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तरी …
पक्ष याची मजा घेतोय …
आता दारोदारी घासलेट विकायला यांना पाठवू नये म्हणजे झाले …
ते मासिक पगार सुरू ठेवला आहे का दादांनी की तो पण बंद केला आहे??? https://t.co/upmMr3jRv7— Gajanan Kale (@MeGajananKale) January 18, 2024
READ ALSO :
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
हेही वाचा“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल