पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांना आणखी एक मोठा पुरावा हाती लागला आहे. याप्रकरणात अटकेत असलेले आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, अमित ऊर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, धनंजय वटकर, सतीश शेगडे, नितीन खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे यांची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठी माहिती न्यायालयात सादर केली.
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित कानगुडे, शेळके, गव्हाणकर, गांदले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. तर वटकर, शेडगे खैरे, गोळे आणि कुरपे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यावेळी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, गुन्ह्याच्या तपासात ऑडिओ क्लिप मिळाली असून , त्यातून महत्वाचा पुरावा हाती लागलेला आहे. तसेच विठ्ठल शेलार आणि फरार गणेश मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापुर्वी एक महिना आधी बैठक घेतली. त्या बैठकीला कोण कोण हजर होते? त्याबाबत तपास करायचे आहे.
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
दरम्यान, वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधील प्रीतसिंग यांच्याकडून शस्र खरेदी केले होते, त्याचा शोध घेत आहोत. त्याला आरोपी सहकार्य करीत नाहीत. आरोपींना त्याचा ठावठिकाणा माहिती आहे. मध्यप्रदेशात एक पथक त्यांचा शोध घेत आहे. बेकायदा शस्र्पुरवठा करण्यात येत असल्याचे पोलिसांची माहिती असल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
हेही वाचा“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
हेही वाचा..“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप