मुंबई : आता रूग्णावाहिका खरेदीमध्येही घोटाळा सुरू झाला आहे. एका रूग्णवाहिकेची किमंत ५० लाखांच्या आसपास असते. यातून १५२९ रूग्णावाहिकेसाठी तब्बल ७६४ कोटी ५० लाख रूपये होता. मात्र ८०० कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी ८ हजार कोटी खर्च केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्याचे वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते. 1,529 अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स 50 लाख या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रूपये होतात. 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहित आहे. अॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना ‘बदली’ची भीती दाखवून साडेतीन-चार हजार कोटींचे टेंडर 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झाले आहे. महायुती सरकारमधील अँम्ब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी . अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
दरम्यान, तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही. दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती. आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, इतका मुजोरपणा? परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावर कारवाई करू नये. असेही त्यांनी म्हटले आहे.
साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते. 1,529 अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स 50 लाख या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रूपये होतात. 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 17, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
हेही वाचा“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचानरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता