मुंबई : कॉंग्रसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेची सुरूवात मणिपुरमधून झाली आहे. राहुल गांधींच्या या यात्रेसाठी देशभरातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर या यात्रेसाठी राहुल गांधी यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत न्याय यात्रेचं निमंत्रण स्विकारलं परंतु त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे एक अट ठेवली आहे.
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो नय्या यात्रेत सामील होणे कठिण जाईल यावर भर दिला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केले गेले नाही. त्यामुळे इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता या६ेत सामील झाल्यामुळे माध्यमांतून, जनेततून, युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पुर्ण झालेली नाही. जनतेला वाटेल की, वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी झाली.
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
प्रकाश आंबेडकरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक लोकशाहीचे महत्व कॉंग्रेसला सांगितले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय लोकशाही आपल्याला सामाजिक लोकशाहीसुद्धा करावी लागेल. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय ? तर अशी जीवन पद्धत जी स्वांतत्र्य, समता व बंधुता यांना जीवनाची तत्त म्हणून स्वीकार करेल, जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर सामाजिक लोकशाहीचा अजेंडा बोलून नाही तर कृतीतून दाखवावा लागेल. सवर्ण केंद्रीत राजकारण सामाजिक लोकशाहीच्या विरोधात आहे. असेही वंचितने म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
हेही वाचा“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचानरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”