पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन सेवा केली. मंदिरात जाऊन नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने काळाराम मंदिराची स्वच्छता करून देशभरातील नागरिकांना आपल्या गावातील मंदिर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले. त्यानुसार आता भाजप नेत्यांकडून स्थानिक मंदिरात जाऊन स्वच्छता केली जात आहे. यातच पुणे शहर भाजप चिटणीस लहू बालवडकर यांनी बालेवाडी परिसरातील मंदिरात जाऊन मंदिराची साफ सफाई केली.
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव
अयोध्यातील श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार १४ ते २२ जानेवारी दरम्यान देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियाना अंतर्गत लहू बालवडकर यांनी बालेवाडी परिसरात भैरवनाथ मंदिरात जाऊन साफ सफाई केली. याचसोबत बालेश्वर महादेव मंदिर, हनुमान मंदिर, सुवर्णमुखी दत्त मंदिर, संतोषी माता मंदिर, याठिकाणी देखील लहू बालवडकर यांनी स्वच्छता केली. अजूनही मंदिराची स्वच्छता मोहिम सुरू असून येत्या काही दिवसात बालेवाडी परिसरातील सर्वच मंदिरात स्वच्छता करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…
यावेळी लहू बालवडकर यांच्यासोबत वैशाली कमाजदार, योगेश बालवडकर, स्वप्निल टकले, राहुल केदारी, शामभाऊ बालवडकर, सुरज मांगडे, विनोद बालवडकर, रोहित बालवडकर, किरण खडांगळे, श्रीकांत नायकुडे, अजित बुरडे, पवन जोध,यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व इतर सर्व ग्रामस्थांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. “येत्या २२ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राम कार्याचा भाग होऊया देव्हाऱ्यातील देवावर अक्षता वाहुया, शुद्ध अंत:करणाने पुजा करून घरोघरी पणत्या लावून दिवाळी साजरी करूया,” असे आवाहन देखील यावेळी लहू बालवडकर यांनी नागरिकांना केले.
READ ALSO :
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश