मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र करण्यात आलं नाही. यामध्ये राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर तर शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठआकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही. याच विरोधात एकनाथ शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली आहे.
हेही वाचा…ठाकरेंची महापत्रकार परिषद..! “त्यामुळे एकनाथ शिंदेंसह सर्वजण अपात्र ठरतात,” असीम सरोदे यांनी सांगितलं कारण
१० जानेवारी रोजी निकाल देतांना विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यातच आता शिंदेंची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही ? व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शिंदे गटाने केली असून याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राचे रोजगार गुजरातमध्ये पळवले जात असताना राज्य सरकार मात्र केवळ केंद्राचं मांडलिक बनून गप्प बसलंय”
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेतून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे. यातच ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहूल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, आणि अजय चौधरी यांना अपात्र करा, अशी मागणी भरत गोगावले यांनी याचिकेतून केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!
हेही वाचाठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…“राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल असीम सरोदेंनी केला चिरफाड”, पाहा नेमकं काय घडलंय?