सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेकजण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच माझा दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्याचा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे. यातच आज मंत्री चंद्रकांत पाटील सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार असल्यानं चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…
काही दिवसापासून प्रणिती शिंदेंसाठी सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. माझं राजकीय करिअर आता संपुष्टात आलं आहे. आता प्रणिती शिंदे पुढची जबाबदारी पार पाडेल. असं विधान सुशील कुमार शिंदे यांनी केलं होतं. यातच प्रणिती शिंदे सोलापूरमधून भाजपच्या तिकीटावर लढतील, अशाही चर्चा राजकारणात सुरू होत्या. यातच आता अक्कलकोटच्या कार्यक्रमातून सुशील कुमार यांनी भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी
दरम्यान, यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी चंद्रकांत पाटील सुशील कुमार शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. परंतु या भेटीमागे काही राजकीय चर्चा होणार का ? ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव