मुंबई : येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठाण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशभरातून अनेकांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले जात आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षातील प्रमुखांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहेत. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आमंत्रण दिले असून त्याबद्दल शरद पवारांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण दिल्याबद्दल श्रीराम मंदिर ट्रस्टचे आभार मानले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील लिहिले आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मात्र, २२ जानेवारी रोजी उत्सव पूर्ण झाल्यानंतर श्रीरामांचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. माझा अयोध्येला येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईल तेव्हा भक्तीभावाने श्रीरामांचे दर्शन घेईल. तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण झालेलं असेल. असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
दरम्यान, घाई घाईत राम मंदिर बांधून तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा पार करून भाजप निवडणुकीची रणनिती आखत आहे. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे आणि त्याचमुळे कॉंग्रेसने २२ जानेवारीच्या निमंत्रणाला नकार दिलं आहे. राम मंदिर पुर्ण झाल्यानंतर आम्ही मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊ, असं कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचानरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार