सोलापूर : निवडणुकांमध्ये माझा दोन वेळा पराभव झाल आहे. असं असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला. त्यावर सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. असंही भाजपकडून सांगण्यात आलं. त्यावर आता सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
अक्कल कोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना भाजपकडून ऑफर आल्याचे सुशील कुमार यांनी सांगितले. त्यावरून राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण आणि तारूण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी ८३ वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार. जरी भाजपने ऑफर दिली तरी कॉंग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही कॉंग्रेस सोडून जाणार नाही. असं सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
दरम्यान, सुशील कुमार शिंदे यांच्या भाजप ऑफरवरू शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ तसेच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिल्यात. परंतु मी भाजपात जाणार या बातम्या सुशील कुमारांनी फेटाळून लावल्या. तसेच मला भाजपमध्ये येण्यास मोठा नेता असून लहान सलान नेत्यांच्या टिकेला मी उत्तर देत नाही, असंही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचानरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं