मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र करण्यात आलं नाही. याविरोधात शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील आमदारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.
हेही वाचा…“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी ही याचिका केली असून न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली .यामध्ये विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून ८ फेब्रवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवणारा विधानसभा अध्यक्षांचा आदेश बेकायदा ठरवून रद्द करावा आणि या आमदारांना अपात्र घोषित करावे, असी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आलीय.
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
दरम्यान, १० जानेवारी रोजी निकाल देतांना विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यातच आता शिंदेंची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही ? व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शिंदे गटाने केली असून याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने देखील १६ आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
हेही वाचा“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
हेही वाचा..“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला