सोलापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार आणि प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच काल मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपकडून दोनदा ऑफर आल्याचा दावा सुशील कुमार शिंदे यांनी केला होता. त्यानंतर राजीकय वर्तुळात एकच चर्चा सुरू होती. यातच मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील आज सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीन बळ मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
२७ तारखेला होऊ घातलेल्या नाट्य समेंलनाच्या उद्घाटनाला त्यांना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. त्याव्यक्तिरिक्त कुठलाही राजकीय विषय घेतलेला नाही. अधिकृतपणे त्यांना भाजपमधून कुणीही ऑफर दिली नाही. राजकीय भेट ही वर्षांनुवर्ष कळत नाही इतकी ती गुप्त असते. त्यामुळे इतक्या जाहीरपणे आलो होतो. तसेच नाट्य परिषदेचे काही अधिकारीही सोबत घेऊन आलो होतो. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.
हेही वाचा..नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
सुशील कुमार यांच्यासारखे सुसंस्कृत कुटुंब अजूनही महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन प्रणिती ताईदेखील आहेत. त्या आक्रमक आहेत. परंतु त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक आहेत. त्यामुळे असे व्यक्तिमत्व भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतचं करू. परंतु त्यांना कुठलीही ऑफर दिली नाही. असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवडणुकांमध्ये माझा दोन वेळा पराभव झाल आहे. असं असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला. त्यावर सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. असंही भाजपकडून सांगण्यात आलं. त्यावर आता सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अक्कल कोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना भाजपकडून ऑफर आल्याचे सुशील कुमार यांनी सांगितले. त्यावरून राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण आणि तारूण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी ८३ वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार. जरी भाजपने ऑफर दिली तरी कॉंग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही कॉंग्रेस सोडून जाणार नाही. असं सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
हेही वाचा..“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
हेही वाचा“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…