सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कराड येथील कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे देखील उपस्थित होते. या प्रदर्शनात ११ देशातील प्रतिनिधी सहभागी झालेत. या प्रदर्शनाच्या वेळी फडणवीसांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. मुंबईत पण काही रेडे मोकाट सुटले आहेत. त्यांचा बंदोबस्त देखील लावला पाहिजे. असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला.
हेही वाचा..नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
या प्रदर्शनामध्ये ४२ लाख रूपयाचा बैल आला आहे. याठिकाणी इलेक्ट्रिक, तसेच सगळ्याच छोटी गाय देखील आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच आमच्या मुंबईत देखील काही मोकाट रेडे सुटले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना असेल तर सांगा. त्यावर कुठलं तंत्रज्ञान आलं असेल तर ते पण आम्हाला शिकवा. असा टोला फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयन राजे यांची एन्ट्री बैलगाडीतून झाली. त्याचाच धागा पकडत राज्याच्या राजकारणाचा कासरा आपल्या हाती घ्या, अन् तुमच्या संघात आम्हालाही सहभागी करून घ्या, असं उदयनराजे यांनी म्हटले. त्यावर देखील फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली.
READ ALSO :
हेही वाचा..“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
हेही वाचा“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…