मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालानंतर मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. ही कारवाई आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाचा आता आणखी एका घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रक्ट देण्यात आलं होतं.
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?
दरम्यान,मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. सुरज चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार याप्रकरणावरून आरोप केला होता. त्यावरून आता कारवाई करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
हेही वाचा“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल