पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला सौम्य भाषेत अन् नंतर मग अजित पवार गटाने शरद पवारांवर टिका करण्यास सुरूवात केलीय. यातच अजित पवार गटाकडून सातत्याे शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जातो. तसेच ८३ वर्ष वय झालं त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं, असा सल्ला देखील दिला जातो. यावरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना टोला लगावला. तर अजित पवारांनी देखील त्यावर पलटवार केला.
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वत: पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्या हिमंत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो. असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तर यावर विचारले असता. नरेंद्र मोदींचं वय ८० झाल्यावर विचारणार ना. आता कशाला विचारू? असं प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोले यांना दिलं.
हेही वाचा….“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
दरम्यान, राहुल गांधी यांची मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असताना कॉंग्रेसचा एक नेता शिंदे गटात नेला. अजूनही कॉंग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न होत असला तरी कॉंग्रेसवर त्याचा काहीही फायदा होणार नाही. जनता या नेत्यांना धडा शिकवेल. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं