पुणे : आजची लढाई विचाराची लढाई आहे. जे लोकं आज गेले आहे, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आणि ते आज भाजपसोबत गेले. सत्ता येते आणि जाते. ती सत्ता लोकांच्या जीवावरील असली पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी आणि सत्ताधारी असे दोन पक्ष असले पाहिजेत. लोकशाहीत एकच पक्ष असला तर तो हिटलरच्या हुकूमशाहीचा पक्ष असतो. आपल्याला हुकूमशाहीचा पक्ष नको. आपल्याला लोकांचा पक्ष पाहिजे. सत्तेतला पक्ष काम करतो, विरोधी पक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतो. असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून. त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वत: च्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहींना काही योगदान असेल ना? असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसोबतत व्यक्त केल्या.
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
बारामती कृषी विज्ञान केंद्र आयोजित ‘कृषिक-२०२४’ कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रम याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे; या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती ? याचा जर अंदाज घेतला, तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मी सांगत होतो की, पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर, खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल. असेही शरद पवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
हेही वाचानाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर