कर्जत : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असल्याने संपुर्ण देशात एव्हाना राज्यात राममय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्याच्या निमित्ताने प्रसादासाठी लाडू तयार करण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कर्जत येथे कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तसेच लोकांचीही गर्दी नसल्याने सुजय विखे पाटलांना आपला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. त्यामुळे रोहित पवारांच्या मतदारसंघात विखे पाटलांनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
हेही वाचा…नाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्यानिमित्ताने खासदार सुजय विखे पाटलांच्या हस्ते आनंदाचा शिधा, साखर आणि डाळ वाटप करण्यात आली. यातच या कार्यक्रमाला जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचीे सभापती काकासाहेब तापकीर, अभय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला भाजप आमदार प्रा. राम शिंदे हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आमदार शिंदे यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती.
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
दरम्यान, यावेळी सुजय विखे पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा एकट्या भाजपचा नसून हा सर्व भारतीयांचा सोहळा आहे. आज वेळ कमी होता. उन्हात जनता बसली आहे. त्यामुळे व्यासपीठावरील लोकांनी भाषण न केल्याने साखर गोड लागेल. अन्यथा भाषणात वेळ गेला असता तर रोषास सामारे जावे लागते. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार