मुंबई : मुंबई महापालिकेत कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यातच आज सुरज चव्हाण यांना पीएमल कोर्टात हजर करण्यात आले. यावर कोर्टाने याप्रकरणी सुनावणी पार पडली असता त्यांना ईडीकडून २२ जानेवारीपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
‘जनता न्यायालया’मधून भाजपची पोलखोल झालेली आहे. शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानंच पुन्हा एकदा शिवसैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचं दिसतंय. कोविड काळात घोटाळे झाले तर मग संजय मशीलकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इकबालसिंग चहल टेंडर दिलेल्या अमेय घोले, प्रवीण परदेशी यांची चौकशी का नाही? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केला.
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
जेव्हा जेव्हा आपल्याकडून सरकारला जाब विचारला जातो, तेव्हा तेव्हा भाजप सुडबुद्धीनेचे राजकारण करून वातावरण बदलण्याचं काम करते. राहुल नार्वेकरांनी अत्यंत खोटारडा निकाल म्हणजेच भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली या सगळ्या गोष्टी पुराव्यासकट परवाच्या महापत्रकार परिषदेत जनतेसमोर मांडल्या. पीएम केअर फंड खाजगी होता तर त्याला पंतप्रधानाचं नाव का देण्यात आलं? हा फंड ज्याच्या खात्यावर जमा झाला त्याची चौकशी का केली नाही? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
हेही वाचानाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप