पुणे : पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी अलिकडेच मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. मेधा कुलकर्णी यांनी अगोदर मटका अड्ड्यावर धाड टाकली अन् त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवले. याची राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. यावरून आता कोथरूडचे आमदार व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदनाम करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी मटका अड्ड्यावर धाड टाकली असल्याचा टोला कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी लगावला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. चार दिवसांपुर्वी माजी आमदार मेधा कुलकर्णी या कोथरूडमधील मटक्याच्या धंद्यावर टाकत स्वत: घुसल्या होत्या आणि मटक्याचा धंदा बंद पाडला होता. कोथरूडमध्ये आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे, गृहमंत्री तुमचेच आहेत अन् तुमच्या बोलवण्यावरून पोलीस येत नाही. पोलिस आल्यावर सगळे निघून जातात. हा काय देखावा चालला आहे का ? कुणाला करण्यासाठी मेधा कुलकर्णी मटक्याच्या अड्ड्यावर गेले होत्या ? कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठीच कुलकर्णी मटक्याच्या अड्ड्यावर गेले होते. हे आता पुणेकरांना कळलं आहे. असं अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
दरम्यान, कोथरूडमध्ये अवैध धंदे चालतात. गुन्हेगारी वाढत आहे, कोथरूड अशांत आहे याची जबाबदारी कुणाची आहे ? दहा वर्षांपासू तुमचे आमदार, तुमचे पालकमंत्री, तुमची सगळी सत्ता आणि तुम्ही उघडपणे जाऊन लोकांना सांगणआर की मी मटक्याचे धंदे बंद केले? तुम्ही स्वत: लाच सर्टिफिकेट देत आहात की, हो आमच्या राज्यात मटक्याचे धंदे चालू आहेत. लोक याचा विचार करणआर नाहीत ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
हेही वाचानाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला