नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभेला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. नाशिक लोकसभेत विद्यमान खासदार हेमंत गोडसे असून त्यांना शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. तर याठिकाणी भाजपकडून आपल्या उमेदवारासाठी जोरदार हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे पुन्हा खासदारकी हॅट्रिक साधणार की ऐनवेळी महायुतीतून भाजपच्या उमेदवारांना संधी दिली जाईल, याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल
नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता बदल होत असते, परंतु २०१४ च्या मोदी लाटेत निवडून आलेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंनी २०१९ चा पुन्हा सत्ता मिळवली. हेमंत गोडसे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी खासदार समीर भुजबळ यांना पाणी पाजलं होतं. मात्र छगन भुजबळांनी देखील महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याने याठिकाणी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीतील उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते दिनकर पाटलांचं नाव चर्चेत आलं आहे. तर आमदार सीमा हिरेंचीही चर्चा सुरू झाली आहे. दिनकर पाटील मागील काही दिवसापासून चांगलेच अक्टीव झाल्याचे दिसून येत आहे. तर हिरेंकडूनही जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार ? याची चर्चा होत असताना महायुतीतून अजित पवार गटानेही या मतदारसंघावर दावा सांगितलाय. अजित पवार गटाकडून समीर भुजबळ इच्छूक असून त्यांची काही दिवसापुर्वी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी निुयक्ती करण्यात आलीय.
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
दुसऱ्या बाजूला जिंकेल त्याची जागा या नियमाप्रमाणे नाशिकची जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तशी घोषणा देखील करण्यात आलीय. तर शरद पवार गटाकडून माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू गोकूळ पिंगले यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आलाय. त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवारांमध्ये सामना रंगणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात मोदी साहेबांचे दौरे वाढले, पक्ष-कुटुंब फोडल्यानंतर झालेल्या सर्व्हेचा भाजपने धसका घेतलाय”
हेही वाचा…“…म्हणून रोहित पवारांच्या मतदारसंघात विखेंनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला”
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान