मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना इडीची नोटीस आली आहे. त्यांना बारामती अॅग्रो कंपनीबाबत इडीने समन्स बजावले आहेत. त्यांना चौकशीसाठी येत्या बुधवारी बोलवण्यात आले आहे. मागील महिन्यापासून बारामती अॅग्रो कंपनीबाबत चौकशी सुरू आहे. यासंदर्भात शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक लोकसभेचं महत्व वाढलं,” कोण रिंगणात, कोण ठरणार किंगमेकर ?
रोहित पवार यांना आधी देखील नोटीस आली होती. त्यामुळे आता पुढे बघू. काय करायचं ते ? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. रोहित पवारांना बारामती अॅग्रोबाबत इडीने समन्स बजावले आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेड हा उद्योग समूह असून रोहित पवार या कंपनीचे सीईओ आहेत.
हेही वाचा…“राज्यात मोदी साहेबांचे दौरे वाढले, पक्ष-कुटुंब फोडल्यानंतर झालेल्या सर्व्हेचा भाजपने धसका घेतलाय”
तर वडिल राजेंद्र पवार संचालक म्हणून आहेत. पशू खाद्य बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही सुरू केलं जात आहे. यातच बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २ साखर कारखाने असून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केल जातात.
तर दुसऱ्या बाजूला कोरोना काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या याप्रकरणी सातत्याने आरोप करत आहेत. त्यावरून आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ