नाशिक : सध्या अयोध्यानगरीसह संपूर्ण देश रामलल्लाच्या प्रतीक्षेत असून राम मंदिर लोकार्पणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यासाठी देशतील अनेक दिग्गज अयोध्येत येणार आहे.त्यासाठी त्यांना रितसर आमंत्रण देखील देण्यात आलं आहे. परंतु एका बाजूला अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाची धूम असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यााचा ठाकरे गटाचा मानस आहे. त्याआधी उद्धव ठाकरे २२ जानेवारीला सांयकाळी पाच वाजता काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. परंतु त्याआधी भाजपने याचा विरोध केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना काळाराम मंदिरात प्रवेश न देण्यासाठी काळाराम मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सुधीर दास यांना पत्र पाठवले आहे. यातच उद्धव ठाकरे यांना काळाराम मंदिरात प्रवेश दिला तर सकल हिंदू समाज काळाराम मंदिरात गोमूत्र शिपडून शुद्धीकरण करणार असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
२२ जानेवारील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार तर उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. तसेच गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरती सुद्धा करणार आहेत. तसेच २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांची सांयकाळी हुतात्मा अनंत कान्हेर मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे. त्याची आता ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू केलीय. यावेळी उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय. तर काळाराम मंदिरातल्या महाआरतीला भाजपने विरोध केलाय.
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
राम कदम यांनी लिहिलेलं पत्र
प्रति,
मान. महंत सुधीर दासजी
प्रमुख पुजारी
काळाराम मंदिर नाशिक
विषय – प्रखर हिंदू अन प्रभू राम विरोधी असणाऱ्या… प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे, मांसाहारी… अन बरेच काही अभद्र बोलणाऱ्या सोबत राहणाऱ्या श्री उद्धवठाकरे यांनी याबाबत काहीही खंडन किंवा विरोध – निषेध केला नाही. त्यांना काळाराम मंदिरात येण्याचा नैतिक अधिकार काय ? आपण त्यांना प्रवेश नाकारणार काय… सप्रेम नमस्कार…
श्रद्धा आणि आस्थेप्रमाणे मंदिरात दर्शन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे याबाबत दुमत नाही मात्र प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारा माणूस प्रभू रामचंद्रांना कोणी मांसाहारी, मदिरापान करणारा म्हणत असेल. प्रभू राम काल्पनिक आहे असे सांगून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागत असेल तर कोणीही राम भक्त ऐकून घेणार नाही त्याचे खंडन करून निषेध करेल. आक्रमक मर्द आहे असे प्रत्येक भाषणात २५ वेळा म्हणणाऱ्यांनी तर अशा प्रवृत्तीचे मुस्काट फोडणे अपेक्षित आहे.
मात्र प्रभू रामांना अपशब्द बोलले जात असताना त्यांची श्रीराम भक्ती कुठे गेली होती. सकल साधु संत समाज याबाबत आक्रोश करत होता तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते. पालघर साधू हत्याकांड मध्ये त्यांचे साधुसंता विषयी प्रेम, श्रद्धा आणि आस्था काय आहे ते संपूर्ण देशाने पाहिले.
दारूची दुकाने नियम आखून उघडली मात्र मंदिरे नियम आखून उघडली नाहीत कडीकुलुपात देवांना बंद ठेवले. किती टोकाचा हा हिंदू विरोध… आणि आता हे जाणार २२ जानेवारीच्या पवित्र दिवशी काळाराम मंदिरात…. वाह रे वाह…. ढोंगी सम्राट
मा. महंतजी सकल हिंदू समाजाची मागणी आहे उद्धव ठाकरेंनी आधी प्रभू रामचंद्रां विषयी अपशब्द बोलणाऱ्यांना खडे बोल सुनवावेत. प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे म्हणून पुरावे मागणाऱ्यांचे कान टोचावे. असे केले तर आणि तरच त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा नैतिक अधिकार आहे अन्यथा स्वतःच्या ढोंगी राजकारणासाठी त्यांनी पवित्र २२ जानेवारी या दिवसाचा आणि काळाराम मंदिराचा आश्रय घेऊ नये त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. हे आपण उद्धव ठाकरे यांना निक्षून सांगणे आवश्यक आहे.
आपण त्यांना अडवा.. अन्यथा ते आल्यास… मांसाहारी बोलणाऱ्या सोबत बसणाऱ्या लोकांचा काळाराम मंदिरात आल्यास..
सकल हिंदू समाजाला *गोमूत्र शिपडून शुद्धीकरण करावे* लागेल धन्यवाद !
आपला.. राम कदम
प्रति,
मान. महंत सुधीर दासजी @mahantpt03
प्रमुख पुजारी काळाराम मंदिर
नाशिकविषय – प्रखर हिंदू अन प्रभू राम विरोधी असणाऱ्या… प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे, मांसाहारी… अन बरेच काही अभद्र बोलणाऱ्या सोबत राहणाऱ्या श्री #उद्धवठाकरे यांनी याबाबत काहीही खंडन किंवा विरोध – निषेध… pic.twitter.com/EvI8qsLpfC
— Ram Kadam (@ramkadam) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार